खोदकामामुळे लकडी पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:53 PM2019-07-14T22:53:59+5:302019-07-15T01:00:20+5:30

इगतपुरी शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन लकडी पुलाला लागून केबल टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

Wood pond risk due to excavation | खोदकामामुळे लकडी पुलाला धोका

खोदकामामुळे लकडी पुलाला धोका

Next

इगतपुरी : शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन लकडी पुलाला लागून केबल टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात दरड कोेसळण्याच्या घटना ताज्या असतानाच ऐन पावसाळ्यात पुलाच्या बाजूला केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल कमकुवत झाला आहे. या पुलाखालून दररोज शेकडो मेल, एक्स्प्रेस व मालगाड्या धावत आहेत. रस्ते मार्गाने शहरात येण्यासाठी हा एकमेव पूल आहे. पुलावरून अवजड वाहन गेल्यास पुलाला हादरे बसत आहेत. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोदकामामुळे पुलाचा पाया कमकुमत होण्याची भीती असून, पूल कोसळला तर मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूकही ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस असून, तालुक्यातील वैतरणा विद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाबाहेर दरड कोसळल्याने हा प्रकल्प तीन महिन्यांकरता बंद करण्यात आला, तर कसारा घाटातील हिवाळा पुलाजवळील रेल्वे बोगद्यासमोर रेल्वे
रुळावर थेट मातीचा मोठा ढीगारा कोसळल्याची घटना घडली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात महामार्गावर दरड व वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. भंडारदºयाला जाणाºया रस्त्यावर भावली धरणाजवळही दरड कोसळली होती. या घटना ताज्या असताना रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात या पुलाला लागूनच खोदकामासाठी परवानगी देणाºया अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून रेल्वे विद्युतपुरवठा होणारी सर्व वीजवाहिन्या पुलावरून मोठ्या टॉवरला जोडल्या गेल्या होत्या. या भूमिगत करण्यासाठी पुलावरील रस्त्याचे खोदकाम केल्याने शहरात येणाºया-जाणाºया नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. या खोदकामामुळे शहरातील मुख्य दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी केली केली आहे.

Web Title: Wood pond risk due to excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.