एकाच कामाचे चार तुकडे करून सर्वच ठेकेदारांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:54 PM2018-10-12T23:54:01+5:302018-10-13T00:43:26+5:30
महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर्व कंत्राटदार समभाव जोपासण्याच्या प्रकाराबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जाब विचारला आणि कंत्राटदारांच्या साखळीला प्रशासनाची मान्यता असल्याचा आरोप केला.
नाशिक : महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर्व कंत्राटदार समभाव जोपासण्याच्या प्रकाराबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जाब विचारला आणि कंत्राटदारांच्या साखळीला प्रशासनाची मान्यता असल्याचा आरोप केला.
दिनकर पाटील यांनी तर आयुक्त मुंढे यांच्या कारकीर्दीत असे ठराव येताच कसे? असा प्रश्न केला. अखेरीस या प्रकाराची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आडके यांनी दिले. मनपाच्या पथदीप देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य खरेदीसाठी महापालिकेने वार्षिक दर मंजुरीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याचे सुमारे ९० लाख रुपयांचे काम मंजुरीसाठी स्थायी समितीवर सादर करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. १२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यास कडाडून विरोध झाल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.
सामान्यत: एखाद्याच्या कामाच्या निविदा मागविल्यानंतर त्यातील प्राप्त निविदाधारकांपैकी न्यूनतम दर भरणाऱ्या कंत्राटदारांना काम दिले जाते; येथे विद्युत साहित्य खरेदीसाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या आणि चारही पात्र ठरून त्यांना काम देण्यात आले. दर भरताना या चारही ठेकेदारांनी साखळी केली नसेल कशावरून, असा प्रश्न करीत उद्धव निमसे आणि दिनकर पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त मुंढे यांच्यावरही कोरडे ओढले आणि अशाप्रकारच्या पारदर्शक कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्यावर विद्युत विभागाचे अभियंता वनमाळी यांनी या प्रकारच्या निविदा पी टू प्रकारच्या असतात, असे सांगून खुलासा केला आणि यापूर्वीही असेच प्रकार होत असल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवकांनी यापूर्वी चुकीचे काम झाले म्हणजे आताही तसेच चालू द्यायचे काय, नगरसेवकांना निविदेतील काही कळत नाही काय असा प्रश्न केला.
वॉक विथ कमिशनर बेकायदेशीर
नगरसेवक निधी मंजूर करूनही कामे होत नसल्याने दिनकर पाटील यांनी पुन्हा प्रशासन आणि आयुक्तांवर शरसंधान केले. बारा लाख रुपयांचा निधी प्रत्येक नगरसेवकाचा असल्याने प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्रितरीत्या सुचविलेले काम केलेच पाहिजे असे सांगताना त्यांनी तुकाराम मुंढे नगरसेवकांची कामे जाणीवपूर्वक रोखतात तसे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले असल्याचे सांगून अनेक आरोप केले. आयुक्त मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम बेकायदेशीर आहे, त्यासाठी शासनाची परवानगी तरी घेतली आहे काय, असा प्रश्न करून नगरसेवकांची कामे आयुक्त करता हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. वॉक विथ कमिशनर बेकायदेशीर
नगरसेवक निधी मंजूर करूनही कामे होत नसल्याने दिनकर पाटील यांनी पुन्हा प्रशासन आणि आयुक्तांवर शरसंधान केले. बारा लाख रुपयांचा निधी प्रत्येक नगरसेवकाचा असल्याने प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्रितरीत्या सुचविलेले काम केलेच पाहिजे असे सांगताना त्यांनी तुकाराम मुंढे नगरसेवकांची कामे जाणीवपूर्वक रोखतात तसे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले असल्याचे सांगून अनेक आरोप केले. आयुक्त मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम बेकायदेशीर आहे, त्यासाठी शासनाची परवानगी तरी घेतली आहे काय, असा प्रश्न करून नगरसेवकांची कामे आयुक्त करता हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.