सारताळे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:12 AM2018-09-01T00:12:34+5:302018-09-01T00:20:54+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी शुक्रवारी (दि.३१) नंदुबार येथील घटनेचा निषेध करून काळया फिती लावून कामकाज केले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सलसवाडी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सचिन मोरे याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी शुक्रवारी (दि.३१) नंदुबार येथील घटनेचा निषेध करून काळया फिती लावून कामकाज केले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सलसवाडी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सचिन मोरे याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. मयत विद्यार्थ्याचे पालक व नातेवाईक आदींच्या जमावाने शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक, प्रकाल्पाधिकारी व तहसीलदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सारताळे येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला.
याप्रसंगी प्राचार्य रवींद्र भामरे, मुख्याध्यापक नम्रता शेवाळे, अधीक्षक रवींद्र पाटील, कैलास पगार, भगवान हिरे, महेंद्र जाधव , वाल्मिक दराडे, भूषण बोरसे, साहेबराव सोळसे, राजेंद्र पगार, समाधान चौधरी, संजय पगार, मोतिलाल जगताप, भैया सोळुंके, संदीप पगार, रवंींद्र पाटील,मिथून पाटील, अशोक पाटील आदींनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला.
तर आश्रमशाळा चालणार कशा?
निवासी आश्रमशाळांमध्ये दुर्दैवी घटना घडल्या तर प्रत्येक गोष्टीसाठी शाळा, प्रशासनच जबाबदार असते असे नाही. मात्र आई-वडिलांपेक्षाही विद्यार्थ्यांची काळजी घेणाºया शालेय प्रशासन, अधिकारी व कर्मचारी यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर आश्रमशाळा चालणार तरी कशा? यासंदर्भात प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी शासनाने कडक कायदे करावेत, अशी भावना सर्व आश्रमशाळेच्या शिक्षक कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.