पुलाचे कामास ऐन पावसाळ्यात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:07 PM2020-07-24T22:07:41+5:302020-07-25T01:11:08+5:30

चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा चौक प्रभाग क्रमांक सहा मधील चांदवड येथील पुरातन लेंडी नाल्यावरील पुल मोठा धोकादायक होता. श्री. नेमिनाथ जैन विद्यालयात शाळेच्या कालावधीत हजारो लहान मोठी मुले ये - जा करीत होते. पावसाळ्यात अनेक वेळा लेंडी नाल्याला पूर येत असे, तर गेल्या काही वर्षापूर्वी या नाल्याला असाच पुर आल्याने पांचाळ वस्तीतील एक तरुण वाहुन गेला होता.

Work on the bridge begins in the rainy season | पुलाचे कामास ऐन पावसाळ्यात सुरुवात

पुलाचे कामास ऐन पावसाळ्यात सुरुवात

googlenewsNext

चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा चौक प्रभाग क्रमांक सहा मधील चांदवड येथील पुरातन लेंडी नाल्यावरील पुल मोठा धोकादायक होता. श्री. नेमिनाथ जैन विद्यालयात शाळेच्या कालावधीत हजारो लहान मोठी मुले ये - जा करीत होते. पावसाळ्यात अनेक वेळा लेंडी नाल्याला पूर येत असे, तर गेल्या काही वर्षापूर्वी या नाल्याला असाच पुर आल्याने पांचाळ वस्तीतील एक तरुण वाहुन गेला होता. तर अनेक टेम्पो, टॅक्सी, लहान मुले या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने पुलावरुन वाहने खाली पडल्याच्या घटना घडत असल्याने या प्रभागातील नगरसेवक कविता उगले, शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले यांनी बऱ्याच वर्षापासून या पुलाला सरंक्षक कठडे व पुलाची रुंदी वाढवावी अशी मागणी केली होती.
या पुलाच्या कामासाठी ३७ लाख ८४ हजार ८०७ रुपये किमंतीची निवीदा मंजुर झाली आहे. दरम्यान या पुलाचे काम ऐन पावसाळ्यात म्हणजे जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात आले असले तरी लॉकडाऊन काळात मजुर, मटेरीअल मिळणे व विविध अडचणीमुळे काम पहिल्या महिनाभर ठप्प होते आता कुठे या कामास सुरुवात झाली असली तरी या पुलासाठी परिसरात जाण्या येण्यासाठी मात्र पर्यायी मार्ग न काढल्याने नागरीकांना कसरत करावी लागत आहे. तर कोरोना पार्श्वभूमीवर श्री. नेमिनाथ जैन विद्यालय व परिसरातील विद्यालये बंद असल्याने विद्यार्थी ये -जा करीत नसल्याने थोडे बरे मात्र जर शाळा सुरु असती तर या पुलावरुन ये जा करणे मुश्किलीचे झाले असते.
चांदवड शहरातून वाहणाºया लेंडी नदीवरील एकलव्यनगरामधील पुलाला मंजुरी मिळाल्याने अस्तिवात असलेल्या धोकादायक पुलावर मे महिन्याच्या अखेरशीस हातोडा पडून येथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे. शनिमंदिराकडून येणारी लेंडी नदी एकलव्य नगराच्या पाठीमागून वाहत जाऊन पुढे गणूरच्या दिशेने जाते, दरम्यान पुढे गणूरकडे जातांना नाल्यामध्ये बºयाच ठिकाणी मोठी अतिक्रमण झाली आहे या लेंडी नदीवर एकलव्यनगरात असलेला पुल काही वर्षापासून धोकादायक बनला होता.
श्री. नेमिनाथ जैन विद्यालय, मविप्रच्या जे.आर.गुंजाळ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, व रंगमहाल यांना जाणारा हा शॉर्टकट मार्ग असून सर्वांना जोडणारा हा पुल शाळकरी मुलांच्या बरोबरच इतर नागरीकांना सोयीचा होता. पुलावर मोठ मोठे भगदाड व दोन्ही बाजुला कठड्यामुळे येथे लहान मोठे अपघात होत असे , पावसाळ्यात तर अनेकदा पूर आला की काही काळासाठी पुलावरील वाहतुक बंद व्हायची अशात मुस्लीम वस्तीत एखादा मृत्यू झाल्यास पुल पार करुन कब्रस्थानमध्ये जाणे बरेच जिकीरीचे व्हायचे या सर्व समस्या बघता येथे नवीन पुल करावा या मागणीसाठी नगरसेवक व अनेकांनी धडपड केली. दरम्यान चांदवड नगरपरिषदेने मुलभूत सुविधा योजनेर्तंगत जिल्हाधि काऱ्यांनी या पुलास प्रशासकीय मान्यता दिली व ३७ लाख ८४ हजार ८०७ रुपये खर्चुन पुलाचे काम मंजुर केले या पुलास १२ महिन्याची मुदत दिली आहे.

Web Title: Work on the bridge begins in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक