्नरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संतत्प ग्रामस्थांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 07:34 PM2019-04-17T19:34:42+5:302019-04-17T19:40:15+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेझ ते जॅकवेल रस्ता कामकाज निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्र ार करीत नागरिकांनी बंद पाडले असून मात्र संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या तक्र ारीची दखल घेतली नसल्याने प्रवाशांना ये-जा करतांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार निवेदन देवून सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने,ठेकेदारा पुढे लोकप्रतिनिधी सह अधिकारी हतबल झाले असल्याचे चिञ दिसत आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेझ ते जॅकवेल रस्ता कामकाज निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्र ार करीत नागरिकांनी बंद पाडले असून मात्र संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या तक्र ारीची दखल घेतली नसल्याने प्रवाशांना ये-जा करतांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत वारंवार निवेदन देवून सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने,ठेकेदारा पुढे लोकप्रतिनिधी सह अधिकारी हतबल झाले असल्याचे चिञ दिसत आहे.
दिंडोरी तालूक्यातील पुर्वभागातील वरखेझ ते राजापूर वरखेझ ते मातेरेवाडी व कादवा सहकारी साखर कारखाना परिसरातील रस्ता व गोपाळ रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, वरखेझ ते जॅकवेल या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामकाज सुरू करण्यात आले आहे.
मात्र संबधित ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी करत हे काम बंद पाडले असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडे तक्र ार मांडण्यात आली असतानाही तक्र ारीला केराची टोपली दाखवत.
कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. यामुळे रस्त्यावर पसरविण्यात आलेली खड्डी अस्ताव्यस्त पडल्याने या मार्गावरून ये-जा करणे जिकरीचे झाले आहे. शेतकरी वर्गाला शेती माल,द्राक्ष पीकाची वाहतूक करणे ही कठीण झाले आहे.व त्याच प्रमाणे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहे. याबाबत तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनावर डी. एस. उफाडे, त्रंबक उफाडे, बापूराव उफाडे, डॉ. टी.डी. अत्तार, सोमनाथ उफाडे, बाळासाहेब उफाडे, पुंडलिक उफाडे, वसंत उफाडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.