शहर स्वच्छतेचा भार १७१२ कामगारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:31 AM2018-05-12T00:31:44+5:302018-05-12T00:31:44+5:30

शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत.

Work on cleanliness of the city 1712 | शहर स्वच्छतेचा भार १७१२ कामगारांवर

शहर स्वच्छतेचा भार १७१२ कामगारांवर

Next

नाशिक : शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. शहराचा वाढता विस्तार पाहता सुमारे ३७०० सफाई कामगारांची निकड आहे. आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्याचाही प्रश्न भिजत पडलेला आहे.
महापालिकेत यापूर्वी १४७४ कामगार प्रत्यक्ष साफसफाईची कामे करायची, तर उर्वरित ३८९ कामगार हे सोयीनुसार अन्य विभागात काम करायचे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सफाई कामगार असूनही अन्य विभागात काम करणाऱ्या या ३८९ कामगारांच्या हाती झाडू सोपविण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यातील २३८ कामगारच प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागले, तर अद्यापही १५१ कामगार आहेत त्याच विभागात कार्यरत आहेत. नगरसेवकांच्या मागणीनुसार सफाई कामगारांचे विभागनिहाय समसमान वाटप करण्यात आले. 

Web Title: Work on cleanliness of the city 1712

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.