सांस्कृतिक केंद्राचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:24+5:302021-02-06T04:25:24+5:30
याबाबत विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग १७ मधील महापालिकेच्या जागेत दलितवस्ती विकास निधीतून या ...
याबाबत विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग १७ मधील महापालिकेच्या जागेत दलितवस्ती विकास निधीतून या केंद्राचे काम सुरू झाले. त्याला ५६ लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केला आहे; परंतु लोकसभा, विधानसभा आदी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे केंद्राचे काम बंद करण्यात आले आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद झालेले काम पुन्हा सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे सांस्कृतिक केंद्राचे काम त्वरित सुरू न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालयापुढे ११ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रिपाइंचे प्रवक्ते प्रमोद बागूल, सरचिटणीस विश्वनाथ काळे, भारत खेडकर, पीयुष गांगुर्डे, दीपक सावंत, सोमनाथ गायकवाड, जयपाल धिवरे, चंद्रकांत भालेराव, विशाल घेगडमल, संजय जाधव आदींच्या सह्या आहेत.