लॉकडाऊनमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:39+5:302021-04-25T04:14:39+5:30
पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील ज्ञानेश्वर गावीत, कैलास भोये, पुष्कर चौधरी, गणेश भगरे, योगेश चौधरी, अरुण चौधरी या कार्यकर्त्यांनी अचानक ...
पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील ज्ञानेश्वर गावीत, कैलास भोये, पुष्कर चौधरी, गणेश भगरे, योगेश चौधरी, अरुण चौधरी या कार्यकर्त्यांनी अचानक कोसळलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर उपाय शोधायचे ठरवले. रोजगारसेवक गायकवाड यांच्याशी चर्चा करून शासकीय पातळीवरून रोजगारासाठी प्रयत्न सुरू केले. सरपंच हरिभाऊ लहारे, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे आणि सदस्य यांच्यासह ग्रामपंचायतनेही महत्त्वाची भूमिका निभावत शिवारात काम उपलब्ध करून दिले. या तरुण कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व कोविडच्या या भयानक संकटाही शासनाच्या मदतीने रोजगार हमी योजनेतून बंधाऱ्यातून गाळ काढणे, डोंगर उतारावर चारी खोदणे आदी कामांच्या माध्यमातून गावातील १०० गरजू लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेवखंडी ग्रामपंचायतीने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
फोटो - २४ पेठ रोजगार
शेवखंडी, ता. पेठ येथे रोजगार हमी योजनेवर काम करताना शेतमजूर
===Photopath===
240421\24nsk_32_24042021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ पेठ रोजगार शेवखंडी ता. पेठ येथे रोजगार हमी योजनेवर काम करतांना शेतमजूर