संपामुळे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:25 AM2017-10-11T01:25:50+5:302017-10-11T01:26:05+5:30
महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
नाशिक : महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
दरम्यान, कर्मचाºयांनी संपावर जातांनाच सकाळी कार्यालयात हजेरी लावून यंत्रावर थम्ब केल्याने नियमानुसार ते कामावर असल्याचे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. या संपाची शासनाला यापूर्वीच कल्पना देण्यात आलेली असल्याने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी जोरदार निदर्शने केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, त्यात महत्त्वाचे म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास अव्वल कारकुनांवर अन्याय होणार असल्याने ही भरती स्थगित करावी ही प्रमुख मागणी संपकरी कर्मचाºयांची असून, त्यापाठोपाठ महसूल कर्मचाºयांचा महसूल सहायक म्हणून नेमणूक देण्यात यावी, नायब तहसीलदारांच्या वेतनातील तफावत दूर करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी दि. ३ आॅक्टोबरपासूनच महसूल कर्मचाºयांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन छेडले आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्याने अखेर मंगळवारपासून जिल्ह्यातील ८३४ कर्मचारी बेमुदत संपावर रवाना झाले. सकाळी पावणे दहा वाजता या कर्मचाºयांनी कार्यालयात नियमित हजेरी लावत रजिष्टरवर उपस्थितीची स्वाक्षरी केली. त्यानंतर यंत्रावर थम्ब करून हजर असल्याची नोंद घेतली व कामकाज बंद केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. सकाळी कार्यालयात आलेल्या अधिकाºयांना त्यांचे स्वत:चे दालन उघडावे लागले. त्यानंतर स्वत:च्या हातानेच कामकाज करावे लागले. दरम्यान, या संपाची कल्पना नसल्याने शासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांना आल्या पावलीच माघारी फिरावे लागले.