नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM2018-04-26T00:17:47+5:302018-04-26T00:17:47+5:30

येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.

The work of Nandgaon Municipal Council is unconditional | नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

Next

नांदगाव : येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.  बहुसंख्य कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते, याकडे नगराध्यक्षांनी उपजिल्हाधिकायांचे लक्ष वेधले. प्रशासनातील अपूर्ण कर्मचारी वर्ग, बेशिस्त व दैनंदिन कामांसह विविध विकासकामांची परवड या विषयांचे गाºहाणे घेऊन नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दि. १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाºयांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी येवला-मनमाड येथील अभियंता यांना अतिरिक्त पदभार देणे, दररोजच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच वेळेवर न येणाºयांसाठी अधिकारी नगर परिषदेच्या कार्यालयात अचानक पाठवून तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिल्या  होत्या; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
११ पदे रिक्त, १८० ठरावांची फाईल
नांदगाव नगर परिषदेत लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची मोठी फाईल जिल्हाधिकारी यांना देऊन नगरसेवकांनी याकडे लक्ष वेधले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उपरोल्लिखित मुद्द्यावर त्वरित कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु नगर परिषदेत आजही ‘जैसे थे’च परिस्थिती आहे.
सहा दिवसाआड पाणीपुरवठा
वाढत्या तपमानामुळे पाण्याची अधिक गरज असताना सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत असलेले पाण्याचे आवर्तन दहा ते पंधरा दिवसांपर्यंत लांबणीवर पडत आहे. शहरातील दुकानदारांची व वाहनांची अतिक्र मणे पायी चालणाºयांसाठी अडथळा ठरत आहेत. नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी या प्रकरणी दिलेले निर्देश कुचकामी ठरले आहेत. पालिका निवडणुकीत भुसे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना देण्याची घोषणा केली होती ती जणू हवेतच विरली असल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे.

Web Title: The work of Nandgaon Municipal Council is unconditional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.