निळवंडी पाडे पुलाचे काम अजूनही अपुर्णं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:57 PM2018-11-17T15:57:28+5:302018-11-17T15:59:15+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम होत नसल्याने निळवंडी व परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निळवंडी ते पाडे या रस्त्यावर असलेला पुलाचे काम अजूनही अपुर्णं असून, दोन वर्षात दोन ते तीन कंत्राटदार बदलेले तरी पण पुलाची अवस्था आहे तशीच आहे.बांधकाम विभाग,याकडे दुर्लक्ष करत आहे. याच नवीन पुलाच्या शेजारी असणारा जुना पूल अर्धा तोडला असून नागरिकांना त्या पुलावरून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा पूल आहे.मात्र या पुलाचे काम रखडले आहे.त्यामुळे संभिधत खात्याने त्याची दखल घेऊन ठेकेदार सुद्धा बदलून टाकला मात्र अजूनही हे काम पूर्ण होत नसल्याने या पुलाचे काम कधी होणार?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सध्या जुना पूल अर्ध्याबाजूने तोडला असून जवळपासच्या गावांचा सम्पर्क तुटला असून ,नागरिकांची कोंडी झाली असून काही अंतर कापून दिंडोरी बाजारपेठेत नागरिकांना यावे लागते आहे.जुना पूल अर्धा तोडल्यामुळे ननाशी,निगडोळ, वणी खुर्द,नळवाडपाडा,येथील नागरिक वळखेडहुन दिंडोरीकडे यावे लागत आहे.त्यामुळे जवळपास १० ते १२ कि. मी.चा अंतर लांब पडत आहे.त्यामुळे शेतीमाल लवकर बाजारपेठेत पोहचत नसल्याने त्यांचाही फटका शेतकर्यांना बसतो.जर तीन वर्ष्या पूर्वीच ठेकेदाराणे या पुलाचे काम केले असते तर, आता ही वेळ नागरिकांवर आली नसती.तसेच निळवंडी पाडे रस्त्याचीही अतिशय दुरवस्था झाल्याने निळवंडी परिसर हा लोक प्रतिनिधींनी वाळीतच टाकल की काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.निळवंडी परिसर हा विविध विकासकामांपासून वंचीत राहिला आहे या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनचालकांना वाहांचालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या पुलाचे काम व निळवंडी -पाडे रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पश्चिम भागातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असुन त्विरत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे .दिंडोरी ,निळवंडी,पाडे निगडोळ ,हा अति रहदारीचा रस्ता असतानां देखिल अधिकारी ,पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य वाढल्याने हे रस्ते म्हणुन असुन घात अण नसुन संताप असे ठरू लागले आहेत .दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे .नुसती चाळणच नाही तर रस्त्यांची महाचाळण म्हटले तर वावगे ठरू नये या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत अनेक वेळा आवाज उठवून देखील त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने आता जनतेचे गाºहाणे मांडावी तरी कुणाकडे पुढारी मुका आणी अधिकारी बिहरा , अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे.
(१७निलवंडी आणि १७ निलवंडी १)