आॅनलाइन सातबाराचे काम आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:55 AM2017-10-12T00:55:29+5:302017-10-12T00:57:48+5:30

नाशिक : आॅनलाइन सातबारा उताºयाचे कामकाज करताना येणाºया तांत्रिक अडचणी दूर करण्यात शासनाला अपयश आल्याने जोपर्यंत सर्व्हरचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कामकाज न करण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतला असून, गुरुवारपासून सातबारा व फेरफार नोंदीची कामे बंद करण्यात येत आहेत.

 Work on online Satara | आॅनलाइन सातबाराचे काम आजपासून बंद

आॅनलाइन सातबाराचे काम आजपासून बंद

Next

नाशिक : आॅनलाइन सातबारा उताºयाचे कामकाज करताना येणाºया तांत्रिक अडचणी दूर करण्यात शासनाला अपयश आल्याने जोपर्यंत सर्व्हरचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कामकाज न करण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतला असून, गुरुवारपासून सातबारा व फेरफार नोंदीची कामे बंद करण्यात येत आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने सातबारा संगणकीकरण करताना सर्व्हरला स्पीड नसल्यामुळे ई फेरफार, रि-ईडीटचे कोणतेही काम होत नसून, त्यासाठी तलाठ्यांना तासन् तास बसून राहावे लागत आहे. यासंदर्भात वर्षभरापासून तक्रारी करूनही उपयोग होत नाही.
दुसरीकडे सातबारा उताºयावाचून शेतकºयांची अनेक कामे खोळंबून राहू लागल्याने त्यांच्याकडून तलाठ्यांवर दबाव येत आहे. त्यामुळे सर्व्हरचा स्पीड वाढविण्यात यावा, अशी मागणी केली होती व त्यासाठी प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
मात्र या काळातही प्रश्न न सुटल्याने अखेर गुरुवारपासून आॅनलाइन कामकाज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title:  Work on online Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.