जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:32 AM2019-09-22T01:32:50+5:302019-09-22T01:35:28+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला.

 Work orders issued by the Zilla Parishad | जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश

जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश

Next
ठळक मुद्देआचारसंहितेत कामे सुरू केल्यास गुन्हा । ग्रामसेवक करणार तपासणी

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचे कार्यारंभ आदेश जारी केले असून, ती कामे यापूर्वीच सुरू झाली असतील तर ठीक, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुपचूप कामे सुरू करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व कामांची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्णातील ग्रामसेवकांना दिले आहेत.
विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, बांधकाम, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागांचे दप्तर ताब्यात घेतले असून, कोणत्याही नवीन कामांचे आदेश वा पत्रव्यहार करू नये, अशा स्पष्ट सूचना खाते प्रमुखांना देण्यात आल्या. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नवीन कामांचे कार्यारंभ आदेश मोठ्या प्रमाणात देण्यात आले, त्या कामांची यादीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खाते प्रमुखांकडून मागविली असून, ही यादी निवडणूक विभागाला सादर करण्यात येणार आहे. या नवीन कामांमधील किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली त्याचीही पाहणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जी कामे सुरू झाली आहेत, ती कामे पूर्ण करण्यात येतील परंतु आचारसंहिता लागल्यानंतर अशी कामे गुपचूप सुरू करण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न नाकारता येणार नसल्याचे गृहीत धरून मंजूर कामांची यादी तालुका पातळीवर पाठवून कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसा प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिला.
भुवनेश्वरी यांनी खातेप्रमुखांना मार्गदर्शन केले असून, तालुका पातळीवरदेखील त्याबाबत दक्षता घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्या अधिकाºयांशी संवाद साधणार आहेत.
पदाधिकाºयांची वाहने जमा
भुवनेश्वरी यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयाचा राजकीय प्रचारासाठी वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिकाºयांची नामफलके झाकण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात अशा पद्धतीने आचारसंहितेची काटेकोरपणे अमलबजावणी सुरू झाली आहे.

Web Title:  Work orders issued by the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.