ओतूर धरणाचे काम अखेर सुरू

By admin | Published: May 15, 2016 10:18 PM2016-05-15T22:18:55+5:302016-05-15T22:33:24+5:30

कळवण : अडीच कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळणार

The work of the Otur Dam is finally started | ओतूर धरणाचे काम अखेर सुरू

ओतूर धरणाचे काम अखेर सुरू

Next

ओतूर : गेल्या दहा महिन्यांपासून निधीअभावी बंद पडलेला कळवण तालुक्यातील ओतूर धरणाचे दुरुस्तीचे काम अखेर दोन दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात मेळघाटचे आमदार पी. बी. भिलवलकर यांनी ओतूर धरणास भेट दिली होती. त्यानुसार आमदार भिलवलकर तसेच आमदार जे. पी. गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सदर धरण दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या धरणास अडीच कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळणार असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले.
सदर धरणाचे काम २०१२ मध्ये डिसेंबर महिन्यात माजी मंत्री ए. टी. पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सात कोटी १२ लाख ४४ हजार रुपये मंजूर करून घेतले होते. गेल्या चाळीस वर्षांपासून सदर धरणाच्या पाणीगळतीचे दुरुस्तीचे काम घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता.
सदर धरणाचे काम सुरू करणेसाठी नियंत्रण आणि देखरेख समितीचे प्रा. अशोक देशमुख, दादाजी मोरे, रमेश रावते, रंगनाथ मोरे, रविकांत सोनवणे, माधव मोरे, रमेश दशपुते, प्रकाश सोनजे, दत्ता सोनजे, नितीन वाघ, देखरेख समिती आणि परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेत. शासनाच्या आदेशावरून शेतकरी सध्या या धरणातून गाळ उपसा करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The work of the Otur Dam is finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.