पाटोदा आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:16 PM2020-03-11T13:16:14+5:302020-03-11T13:16:20+5:30
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले आहे.
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले आहे.
पाटोदा येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रु पये निधी मंजूर असलेला सुसज्ज असा दवाखान्याच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरु आहे.परंतु प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यअध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आले व इमारतीचे सुरु असलेले निकृष्ठ दर्जाचे काम त्यावर आक्षेप ठेऊन प्रहार संघटनेने कामाच्या पायाभरणीवरच बोट ठेऊन काम बंद पाडले. येवला तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या महत्व असलेल्या पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय निधीतून सुरु आहे. पायाभरणीचे काम निकृष्ठ दर्जाचे बांधकाम मटेरीअल वापरत असल्याचे गावातील प्रहारचे जिल्हा कार्यअध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे व शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ यांच्या लक्षात आले. त्यांनी इतर कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने बांधकाम स्थळी जात पाहणी करून सुपरवाईझर व ठेकेदार यांना सदर काम निकृष्ठ दर्जाचे होत असून कामाच्या प्लन इस्टीमेट बाबत विचारणा केली. वास्तविक शासन विकास कामांसाठी जनसामान्यांच्या करातून आलेली कोट्यवधी रु पयाची रक्कम खर्च करते पण संगनमताने सर्वस्थरीय चळवळीतून मोजकी रक्कम शेवटच्या घटका पर्यंत पोहचवत असताना असे गैरप्रकार प्रहार संघटना खपवून घेणार नाही, असे रामभाऊ नाईकवाडे, गोरख निर्मळ व त् हरिभाऊ महाजन यांनी सांगितले.यावेळी सुनील पाचपुते, सरपंच चंद्रकला नाईकवाडे, दिनेश जगताप, रतन बोरनारे, बाळासाहेब बोराडे, सोमनाथ भुसारे, किशोर भोसले, दत्तू बोरनारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------
सुपरवायझर निरूत्तर तर ठेकेदाराची सारवासारव
सदर ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रामभाऊ नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापती यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत निकृष्ठ कामाबाबत माहिती दिली. सदर ठेकेदार ठराविक मापदंडा नुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या व सदर अधिकाऱ्यांनी लवकरच पाहणी करत असल्याचे सागितले. याबाबत सुपरवायझर निरूत्तर झाला तर ठेकेदाराने सारवासारव केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.