नांदगावी सातव्या दिवशीही पाणी उपसण्याचे काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:08+5:302021-09-15T04:18:08+5:30
सुशांती प्रोव्हिजनचे दोन तळ मजल्यात साखरेचे ८० व तांदळाचे ६० कट्टे होते. सगळी साखर पाण्यात विरघळून गेली. इतरही अनेक ...
सुशांती प्रोव्हिजनचे दोन तळ मजल्यात साखरेचे ८० व तांदळाचे ६० कट्टे होते. सगळी साखर पाण्यात विरघळून गेली. इतरही अनेक किराणा मालाच्या वस्तू होत्या. मीठ विरघळून गेले. सत्यम कलेक्शन या रेडिमेड दुकानात ओल्या जीन्स, शर्ट, अंडरवेअर घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. तळघरातले कपडे पाण्यात भिजले आहेत. दुकानाबाहेर ओल्या रेडिमेड कपड्यांची बोचकी आणून ठेवली जातात. ग्राहकांनाही पर्वणी वाटत असून बारगेनिंग किती करायचे याला मर्यादा नाही. १०० रुपयांची वस्तू दहा आणि वीस रुपयांत मागितली जाते. कपडे वाळवायला गेले तर ते आवाक्याबाहेरचे असल्याने येईल त्या किमतीला दुकानदार विकत आहेत. ग्राहकांची गर्दी झाली असून कोणत्या दुकानात पाणी शिरले होते. कोणत्या वस्तू होत्या. याचा शोध घेत फिरणारे रस्तोरस्ती दिसत आहेत. एकंदरीत ग्राहकांची चंगळ झाली असली तरी दुकानदार वस्तू खराब होऊन १०० टक्के नुकसानीस सामोरे जाण्यापेक्षा जेवढे दाम पदरात पडेल तेवढे पाडून घेण्याच्या मागे आहेत.
---------------------------
नांदगावी तळघरातळे पाणी उपसले गेले, पण नुकसानीमुळे आलेली विमनस्कता जात नाही. तळघरात आढ्यापर्यंत पाणी भरले होते. (१४ नांदगाव १/२)
140921\14nsk_7_14092021_13.jpg
१४ नांदगाव २