मौजे-अंबड खुर्द येथे हक्क चौकशीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:41 AM2018-06-02T00:41:38+5:302018-06-02T00:41:38+5:30
मौजे-अंबड खुर्द गावांच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले असून, हक्क चौकशीचे काम मे २०१८ पासून सुरू झालेले आहे.
नाशिक : मौजे-अंबड खुर्द गावांच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले असून, हक्क चौकशीचे काम मे २०१८ पासून सुरू झालेले आहे. अंबड खुर्द येथील तसेच अंबड गावठाण व अंबड एम.आय.डी.सी मधील सर्व मिळकतीचे हक्क चौकशीचे काम विशेष उपअधीक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नकाशे अंतिम करून मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. कागदपत्राअभावी होणाऱ्या संभाव्य त्रुटी टाळण्याच्या दृष्टीने वरील गट नंबर मधील मिळकतधारक यांनी त्याचे हक्क सिद्ध करणारे पुरावे तत्काळ विशेष उपअधीक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी अधिकारी, नाशिक यांच्या कार्यालयात सादर करावे व आपला मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद झाल्याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन विशेष उपअधीक्षक भूमि अभिलेख, अधिकारी संजय तेजाळे यांनी केले आहे.