नदीजोड योजनेची कामे त्वरित सुरू करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:29+5:302021-07-11T04:11:29+5:30

दिंडोरी : दमणगंगा, एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनेची कामे लवकरात लवकर ...

Work on river connection scheme should be started immediately | नदीजोड योजनेची कामे त्वरित सुरू करावीत

नदीजोड योजनेची कामे त्वरित सुरू करावीत

Next

दिंडोरी : दमणगंगा, एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करावीत, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दमणगंगा, एकदरे-गोदावरी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन या योजना त्वरित कार्यान्वित कराव्यात असे निर्देश देण्यात आले.

यावेळी झिरवाळ यांनी योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे पाणी हे वाघाड धरणात येणार असून सदर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तोही काढण्याचे काम या प्रकल्पात समाविष्ट करावे. त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता व इतर बाबींकरिता प्रस्ताव त्वरित सादर करावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटून सिंचनात‍ वाढ होईल असेही पाटील यांनी म्हटले आहे. बैठकीच्या प्रारंभी विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. याचा सविस्तर अहवाल (डीपीआर) हा राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्ल्युडीए) नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबर २०२१ अखेर अहवाल जलसंपदा विभागास सादर होऊ शकेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता अ.रा. नाईक यांनी दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए.एन. मुंडे, मुख्य अभियंता नाशिक प्रादेशिक विभाग, डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Work on river connection scheme should be started immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.