संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे काम गेल्या सात महिन्यांपासून संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 06:53 PM2020-10-28T18:53:52+5:302020-10-28T18:55:35+5:30
त्र्यंबकेश्वर : निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यां पासून बंद असून ते अतिशय संथगतीने केले जात आहे.
त्र्यंबकेश्वर : निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यां पासून बंद असून ते अतिशय संथगतीने केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम बंद पडले होते. कळसापर्यंत काम पुर्ण होण्यास अद्याप १६ फुट काम बाकी आहे. तेव्हा कळसाचे काम पुर्ण होणार आहे अशी माहिती निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष पवन भुतडा यांनी दिली.
कोल्हापूरहून दगड आला आहे. एवढ्या दगडातली काम पुर्ण होणार नाही. अजुन चार ट्रक पाठवले आहेत. दगडांच्या खाणित हवा असलेला दगड लवकर मिळत नाही. चार पैकी दोन ट्रक दगड येईल. त्यानंतर दोन ट्रक दगड केव्हा येईल याची खात्री नाही. पण काम सध्या सावकाशपणे चालु असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या असलेले कारागिर सुबक पद्धतीने काम करीत असुन त्यांना काम उरकण्याची घाई करणार नाही. काम कारागिरांच्या पध्दतीनेच झाले पाहिजे. उगीच ओबड धोबड काम करण्यात अर्थ नाही. अजुन कारागिर वाढणार आहेत. २० ते २५ पर्यंत कारागिर वाढणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आले होते. सर्व कारागिर राजस्थान येथे गेले होते. आता काही कारागिर आले आहेत. मशीनवर दगड कापले जात आहे.
एप्रिल मध्येच विश्वस्त मंडळाची मुदत संपली आहे. मुदत संपण्याअगोदर मार्च मध्ये मुदत संपणार असल्याबद्दल धर्मात आयुक्तांनी पत्र दिले होते. मुदत संपल्यानंतर पुनश्च मुदत संपली असल्याबद्दल पत्र दिले होते. दरम्यान विद्यमान विश्वस्त मंडळास मुदतवाढ मिळाली नसुन कोणत्याही क्षणी नुतन विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी नोटीस निघु शकेल असे अध्यक्षांनी सांगितले.
दरम्यान निवृत्तीनाथ मंदीर जीर्णोध्दाराचे कॉन्ट्रॅक्टर श्रीहरी तिडके यांना कामांबाबत विचारले असता दगडांसाठी काही वेळेस वेटींग देखील करावे लागते. आम्ही ज्या खाणीतुन दगड आणतो तेथुनइतरही कामाकरीता दगड घेत असतात. त्यामुळे लवकर दगड उपलब्ध झाल्यास तीन किंवा साडेतीन महिन्यात काम पुर्ण होईल असा विश्वास ठेकेदारांनी व्यक्त केला.