सटाणा-ताहाराबाद रस्त्याचे काम कासवगतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:14+5:302021-09-12T04:18:14+5:30

करंजाड येथील शेतकऱ्यावर ठेकेदाराकडून शिवीगाळ झाल्याचा मुद्दा ताजा असताना ढोलबारे परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे. ढोलबारे, करंजाड ...

Work on Satana-Taharabad road begins at a snail's pace | सटाणा-ताहाराबाद रस्त्याचे काम कासवगतीने सुरू

सटाणा-ताहाराबाद रस्त्याचे काम कासवगतीने सुरू

googlenewsNext

करंजाड येथील शेतकऱ्यावर ठेकेदाराकडून शिवीगाळ झाल्याचा मुद्दा ताजा असताना ढोलबारे परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा अरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे. ढोलबारे, करंजाड व पिंगळवाडे परिसरातील शेतकयांच्या म्हणण्यानुसार त्यांचे द्राक्षे, डाळिंब, कांदे, भाजीपाला पिकांचे धुळी व चिखलामुळे अतोनात नुकसान होत आहे. ठेकेदाराला वारंवार सूचना करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण चालूच आहे. वेळोवेळी जाब विचारला असता शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करण्यात येते, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू आहे. प्रशासनाने जाब विचारल्यास ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. रस्त्या लगतच सिमेंट काँक्रीट प्लांट उभारला असून करंजाड, पिंगळवाडे, ढोलबारे परिसरातील शेतकऱ्याकडून अथवा ग्रामपंचायतीकडून कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे प्रदूषण होत असून त्याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच दिवसेंदिवस शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून या सर्व प्रकारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. ग्रामपंचायत करंजाड, पिंगळवाडे, व ढोलबारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार हा सिमेंट काँक्रीट प्लांट निर्जनस्थळी त्वरित हलविण्याची मागणी केलेली आहे. तसेच हा सिमेंट काँक्रीट प्लांट हा माजी आमदारांच्या जागेवर असून त्यांनासुद्धा संशयाच्या नजरेने बघितले जात आहे. हा सिमेंट काँक्रीट प्लांट निर्जनस्थळी न हलविल्यास परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

फोटो - ११ सटाणा रस्ता

सटाणा येथे रस्ता व अतिक्रमणप्रश्नी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देताना शेतकरी.

110921\11nsk_9_11092021_13.jpg

सटाणा येथे रस्ता व अतिक्रमणप्रश्नी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देताना शेतकरी.

Web Title: Work on Satana-Taharabad road begins at a snail's pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.