निम्मा रस्ता झाल्यावर काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:37+5:302020-12-13T04:30:37+5:30
महापालिकेच्या सिडको विभागाच्यावतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून बडदे नगर ते पाटील नगर दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले ...
महापालिकेच्या सिडको विभागाच्यावतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून बडदे नगर ते पाटील नगर दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले असून, रस्त्याचे काम बऱ्यापैकी सुरू असताना ज्यांनी रस्त्यासाठी जमिनी महापालिकेकडे हस्तांतरित केल्या; परंतु त्यातील बहुतांशी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला दिला गेला. एका शेतकऱ्याला मोबदला मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आल्याने सदरचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्धा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यानंतर पुढच्या रस्त्याचे काम रखडले आहे. बडदे नगर ते पाटील नगर या रस्त्याचे पूर्ण काम झाल्यावर अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांसाठी हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. (फोटो १२ रोड)