सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:45 PM2019-04-03T23:45:56+5:302019-04-03T23:47:02+5:30
नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.
नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.
सध्या सर्वच क्षेत्रात आॅनलाइन व्यवहार सुरू झाले आहेत. राज्यातील महसूल विभागातही सुरू झालेले आॅनलाइन कामकाज मात्र गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाउन झाल्याने जिल्ह्यातील विविध शासकीय कामे ठप्प झाल्याने ग्रामस्थांंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुलभ वाटणारे आॅनलाइनचे हे काम वारंवार डाउन होणाºया सर्व्हरची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व्हर डाउन झाल्याने शेतकऱ्यांना विविध ठिकाणी कामाला येणारा सातबारा दररोज तलाठी कार्यालयात चकरा मारूनही मिळत नाही. चार गावांचे मिळून एकच तलाठी सजा असलेल्या ठिकाणी काही किलोमीटर अंतराचा प्रवास करून नागरिक येतात; मात्र दररोजच सर्व्हर डाउन असल्याने रिकाम्या हातीच परतण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांना वेळेसह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सर्व्हर डाउन होण्याच्या प्रकारामुळे शासकीय योजनांचे कामकाज ठप्प झाले. शासनाच्या कांदा अनुदानासाठी मुदतीत सातबारा न मिळाल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यातच सर्व्हर डाउनच्या कारणावरून तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तर काम वेळेत होत नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांच्या जाचाचा सामनाही करावा लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांना सर्व्हर डाउनबाबत समजावून सांगताना तलाठी तात्यांच्या नाकीनव येत आहे. दररोज आपल्या सजेत येऊनही तलाठ्यांना लोकांची कामे करता येत नसल्यामुळे ग्रामस्थांंच्या अपूर्ण कामांची तलाठ्यांना सजेतच सजा मिळत आहे.
सर्व्हर डाउनच्या कारणांमुळे शेतकºयांना वेळेत सातबारा उतारा न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. तसेच आठवडाभरापासून शाळा, महाविद्यालये, जमीन, शेती कर्ज आदींसह विविध ठिकाणी लागणारा सातबारा वेळेत मिळत नसल्याने कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
- दत्ताराम डोमाडे, सामाजिक कार्यकर्ते, देशवंडीवारंवार अडथळ्यांची शर्यतराज्यातील सर्वच शासकीय कामे संगणकीय झाली आहे. सुरुवातीला सुलभ व तत्काळ सेवा मिळणार असल्याने आॅनलाइन कार्यप्रणालीचे सर्वच थरातून स्वागत झाले. सर्वसामान्य ग्रामस्थांंना या आॅनलाइन प्रणालीची सवय लागण्याच्या आतच अडचणीची वाटणारी सेवा वारंवार सर्व्हर डाउनमुळे सध्या अडथळ्यांची ठरत आहे.