आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर पथदीपाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:01 AM2019-06-25T01:01:51+5:302019-06-25T01:02:29+5:30

बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो.

 Work of street work on Adgaon-Mhasrul road | आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर पथदीपाचे काम सुरू

आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर पथदीपाचे काम सुरू

googlenewsNext

आडगाव : बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. शिवाय गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत पसरल्याने पथदीप बसविण्याची मागणी लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे.
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंग रोड) हा मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, महावीर कॉलेजकडे, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेज, आरोग्य विज्ञान पीठकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून या रस्त्याच्या वापरामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताणदेखील कमी होतो. शिवाय सागर व्हिलेज, श्रीरामनगर, कर्मयोगीनगर, आशा कन्सट्रक्शन, राम गाडीया भवन, के. के. वाघ शाळा, भुजबळ कॉलेज हॉस्टेल, पोलीस वसाहत, एचएएल कर्मचारी वसाहत या मार्गावर आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावर वर्दळ असते. या मार्गावर अनेक वेळा सोनसाखळी चोऱ्या, भुरट्याचोºया आणि गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहे.
नागरिकांत समाधान
गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या रस्त्याच्या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे. पण अर्धा मार्ग अंधारात असल्यामुळे रात्रीचे जाणे येणे बरेच लोक टाळतात त्यामुळे उर्वरित मार्गावर पथदीप बसवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. या रस्त्यावर पोल बसविण्यात आले असून, लाइनचे कामदेखील पूर्ण झाले असून, लवकरच पथदीप सुरु होणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

Web Title:  Work of street work on Adgaon-Mhasrul road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.