भूमिगत गटारीच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:47 AM2018-06-28T00:47:30+5:302018-06-28T00:47:42+5:30
माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील भूमिगत गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि धवळखडी येथील अंगणवाडीत पत्रे गळके असल्याने अंगणवाडीत पावसाचे पाणी साचल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन खडबडून जागे होत प्रत्यक्ष गावात जाऊन गटारीचा प्रश्न व अंगणवाडी तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर करून प्रश्न मार्गी लावला आहे.
लोकमत वृत्तानंतर जेसीबीच्या साहाय्याने भूमिगत गटारीचे सुरू
झालेले काम.
माळवाडी : फुले माळवाडी (ता. देवळा) येथील भूमिगत गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि धवळखडी येथील अंगणवाडीत पत्रे गळके असल्याने अंगणवाडीत पावसाचे पाणी साचल्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकल्यानंतर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन खडबडून जागे होत प्रत्यक्ष गावात जाऊन गटारीचा प्रश्न व अंगणवाडी तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर करून प्रश्न मार्गी लावला आहे.
फुले माळवाडी गावातील गटार प्रश्न व अंगणवाडीत पाणी साचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत सरपंच कैलास बच्छाव, ग्रामसेवक अंजली सोनजे, विस्तार अधिकारी सावंत, अभियंता रावसाहेब चव्हाण, मुख्य सेविका कल्याणी चव्हाण आणि गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी गटविकास अधिकारी पाटील यांनी खासगी जागेत वर्ग भरत असलेल्या अंगणवाडीला चांगल्या स्थितीत असलेल्या हिरामण बागुल यांच्या खासगी जागेत स्थलांतरित केले. तसेच गावातील भूमिगत गटारीला अधिक चेंबरसंख्या वाढवण्यासाठी ग्रामसेवक व अभियंता यांना सूचित केले. त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या दिरंगाईबद्दल ठेकेदार व पंचायत समिती सभापती यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन अभियंता चव्हाण यांना उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याबाबत सूचना दिली.ठेकेदार व अभियंते यांच्याशी चर्चा करून
फुले माळवाडी गावातील प्रश्न ताबडतोब सोडवण्यास सुरु वात केली आहे, तसेच दिरंगाईने होत असलेल्या अंगणवाडीचे बांधकाम एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.
- महेश पाटील, गटविकास अधिकारी, देवळागटविकास अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार ग्रामस्थांसमवेत प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.
- अंजली सोनजे
ग्रामसेवक, फुले माळवाडी