द्राक्षबागांच्या कामांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:34 PM2019-12-03T13:34:43+5:302019-12-03T13:34:51+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्षबागांच्या थिनींगचे कामे सुरु असुन नगदी पिकांच्या माध्यमातून अर्थप्राप्तीचे नियोजन आखणारे उत्पादक व्यस्त झाले आहेत.
वणी : दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्षबागांच्या थिनींगचे कामे सुरु असुन नगदी पिकांच्या माध्यमातून अर्थप्राप्तीचे नियोजन आखणारे उत्पादक व्यस्त झाले आहेत. द्राक्षबागाच्या कामांना वेग आला आहे. सध्या थिनींग या प्रक्र ीयेचे काम सुरु आहे. द्राक्षबागावरील एका झाडावर सुमारे पन्नास घड द्राक्षाचे असावेत असे नियोजन उत्पादकांचे असते. थिनिंग म्हणजे द्राक्षाच्या एका घडामध्ये पन्नास मणी असावेत त्यापेक्षा जास्त असल्यास ते काढुन टाकावे लागतात. यामुळे घडावरील द्राक्षांना पोषणतत्व मिळणे, नैसर्गिक वाढ होणे तसेच कडकपणा व आकारमानात वाढ होते. कारण किमान वीस एमएम आकारमान द्राक्षाचे ठेवण्यासाठी ही प्रक्रि या करण्यात येते. त्यासाठी द्राक्षमण्यांना जागा मिळाली तर ही प्रक्रि या यशस्वी होते असे आडाखे उत्पादकांचे असतात.यापुर्वी डिपींग म्हणजेच द्रव पदार्थाची फवारणी नंतर थिनींग व त्यानंतर पुन्हा डिपींग यात द्रवस्वरु प औषधात द्राक्षघड बुडविण्यात येतात.ही सर्व कामे करण्यासाठी अद्यावत यंत्रसामुग्री आहे. त्याचा खर्च दोन हजार रु पये एकरी आहे. टप्याटप्याने ही कामे करण्यात येतात, मात्र यंत्रसामुग्रीमुळे द्रवस्वरु पाची औषधे जास्त लागतात. ही औषधे महागडी असतात. हेच काम मजुरांकरवी केले तर मजुरी महाग जाते मात्र आवश्यक तेथेच ओषधाचा प्रभावी वापर होतो व हेतू साध्य होतो अशी माैिती देण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रक्रि येत द्राक्षउत्पादक व्यस्त असुन नगदी पिक म्हणून परिचित द्राक्षाच्या भरवशावर वर्षभराचे नियोजन असल्याने या सर्व कामास अग्रक्र म देण्यात येत आहे.