शिक्षकांना पुन्हा मतदार यादीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:07 AM2017-09-10T01:07:33+5:302017-09-10T01:07:50+5:30
शिक्षकांना शिक्षकेतर कामे देण्यावरून वाद कायम असतानाच आता पुन्हा एकदा मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज भासणार असल्याने त्याकामी बीएलओ म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचीच नेमणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहे.
नाशिक : शिक्षकांना शिक्षकेतर कामे देण्यावरून वाद कायम असतानाच आता पुन्हा एकदा मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज भासणार असल्याने त्याकामी बीएलओ म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचीच नेमणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी १ जानेवारी २०१८ ही अर्हता दिनांक ग्राह्य धरून नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने नवीन मतदारांची नोंदणी करतानाच त्यांच्या छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम केले जाणार आहे. देशपातळीवर एकाच वेळी हाती घेण्यात येणाºया या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज लागणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. गट पातळीवर जाऊन प्रत्येक मतदारांची खात्री करण्याचे काम बीएलओ म्हणजे ब्लॉक लेव्हल आॅफिसर यांना करावे लागणार असल्याने त्यासाठी नेहमीपेक्षा अधिक कर्मचारी लागणार असल्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांनी आपल्या अखत्यारितील शासकीय कर्मचाºयांच्या सेवा या कालावधीत निवडणूक कामांसाठी वर्ग कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ज्यांनी बीएलओची कामे केली त्यांना
कामे देऊ नये. शक्यतो नवीन कर्मचाºयांची याकामी नेमणूक करावी, असा सल्लाही आयोगाने दिला आहे.
दरम्यान, विशेष आयोगाचे महिनाभर चालणारे काम दैनंदिन कामकाज सांभाळून उर्वरित फावल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असल्यामुळे शिक्षकांशिवाय दुसरा कोणताच पर्याय प्रशासनासमोर दिसत नाही.