‘त्या’ कामचुकार पालिका कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:22 AM2017-08-02T00:22:40+5:302017-08-02T00:23:13+5:30
श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायदा घेणाºया कर्मचाºयांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
नाशिक : श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायदा घेणाºया कर्मचाºयांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, आयुक्तांनी प्रशासनाकडून दुसºया श्रावणी सोमवारी (दि. ३१ जुलै) राजीव गांधी भवनमध्ये मुख्यालयात कर्मचाºयांचा बायोमेट्रिकचा डाटा मागविला आहे.
महापालिकेने श्रावणी सोमवारी कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत केलेली आहे. श्रावणी सोमवारी कर्मचाºयांना दोन तास अगोदरच सुटी देण्याचा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत चालू आहे. मात्र, श्रावणी सोमवारी दुपारपासूनच कर्मचारी कार्यालयातून गायब होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार, ‘लोकमत’ टीमने दुसºया श्रावणी सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत पाहणी केली असता, काही विभागांमध्ये तुरळकच कर्मचारी आढळून आले तर काही विभागात सामसूम दिसून आली. ‘लोकमत’ने हा सारा आॅँखो देखा हाल मांडल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून श्रावणी सोमवारी दि. ३१ जुलै रोजी उपस्थित कर्मचाºयांचा बायोमेट्रिक डेटा मागविला आहे. याबाबत आयुक्तांनी सांगितले, फिल्डवर कुणी कर्मचारी अथवा अधिकारी कार्यरत असेल तर त्याच्याबाबत वेगळा विचार होऊ शकतो परंतु, जे स्थायी कर्मचारी आहेत ते नियोजित वेळेत आपल्या टेबलवर हजर नसतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे.