रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 01:31 AM2022-03-04T01:31:36+5:302022-03-04T01:32:04+5:30

मुंबईनाका परिसरातील एका मोठ्या रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून युवा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२)मध्यरात्री घडली. अश्पाक शब्बीर नगीनेवाले (२५, रा. मदिना चौक) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Worker killed after falling into hospital elevator pit | रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून कामगार ठार

रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून कामगार ठार

Next
ठळक मुद्देमुंबई नाका : पाचव्या मजल्यावरून पडला खाली

नाशिक : येथील मुंबईनाका परिसरातील एका मोठ्या रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात कोसळून युवा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२)मध्यरात्री घडली. अश्पाक शब्बीर नगीनेवाले (२५, रा. मदिना चौक) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईनाका येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर या रुग्णालयात ठेकेदारामार्फत नेमून देण्यात आलेल्या कामानुसार अश्पाक हा बुधवारी रात्री लिफ्टच्या दारावर पोस्टर्स लावण्यासाठी पाचव्या मजल्यावर गेला होता. यावेळी हा युवक अचानकपणे लिफ्टच्या चेंबरमध्ये कोसळला. यामुळे जबर मार लागून गंभीर जखमी झालेल्या अश्पाकचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अश्पाकचे नातेवाईक, मित्र परिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मुंबईनाका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकारी, रुग्णालयाच्या प्रशासनाने संतप्त नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोपर्यंत रुग्णालय प्रशासनापैकी दोषी असणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे तणाव अधिकच वाढला. यामुळे दंगलनियंत्रण पथकाला रुग्णालयाच्या आवारात पाचारण करण्यात आले होते. सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत आहेर आदींनी जमावाची समजूत काढत तत्काळ रुग्णालयाचा परिसर रिकामा करण्यास सांगितले. यावेळी अश्पाकच्या काही जवळच्या नातेवाईकांसोबत रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला. तसेच नुकसानभरपाई अश्पाकच्या वारसदाराला मिळावी अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती. अश्पाकच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास मुंबईनाका पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Worker killed after falling into hospital elevator pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.