कामगारांना बारा तास काम करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:54 PM2020-05-06T19:54:25+5:302020-05-06T19:56:53+5:30

सातपूर : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर आता कामगारांकडून बारा तास काम करुन घेण्यास ...

Workers are allowed to work twelve hours a day | कामगारांना बारा तास काम करण्यास परवानगी

कामगारांना बारा तास काम करण्यास परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देओव्हरटाइमचा मोबदला दुप्पट देण्यात यावाउद्योग वर्तुळात समाधान

सातपूर : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर आता कामगारांकडून बारा तास काम करुन घेण्यास उद्योग विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने उद्योग वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने दि.24 मार्च पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान दि.20 एप्रिल पासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन केंद्रसरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास 5 हजाराच्यावर लहान मोठे उद्योग सुरु झालेले आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण कामगारांना कामावर बोलविता येणार नाही.त्यामुळे पूर्ण क्षमतेने उत्पादन प्रक्रिया सुरु होऊ शकणार नाही.याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने उद्योग आणि कामगार विभागास दि.16 एप्रिल रोजी पत्र पाठवून बारा तास काम करण्याची परवानगी मागितली होती.या पत्राची दाखल घेऊन कामगार व उद्योग विभागाचे उपसचिव डॉ.एस.एल. पुलकुंडवार आपत्कालीन परिस्थितीत ज्या उद्योगात कामगारांची गरज भासत असेल अशा कारखान्यात बारा तास काम करण्यास,बारा तासांची दोन शिफ्ट करण्यास परवानगी दिली आहे. मात्र अतिकालीक (ओव्हरटाइम) कामाचा मोबदला दुप्पट देण्यात यावा.आठवड्यात 60 तासांपेक्षा अधिक अतिकालिक तसेच सात दिवसांपेक्षा अधिक नसावे.असे स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट :- कामगार व उद्योग विभागाने कारखाना अधिनियम 1948 च्या कलम 65 (3) मध्ये शिथिलता आणून राज्यातील उद्योजकांना कामाच्या तासात सूट दिली आहे.ही सवलत दि.30 जून 2020 पर्यंत लागू रहाणार आहे.याबाबत महाराष्ट्र चेंबर आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयास पत्र पाठवून अवगत करण्यात आले आहे.या निर्णयामुळे उद्योग जगतात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Workers are allowed to work twelve hours a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.