कार्यकर्ते अडगळीत!

By admin | Published: November 16, 2016 11:10 PM2016-11-16T23:10:57+5:302016-11-16T23:08:33+5:30

सेटलमेंट : नेत्यांच्या घरात उमेदवारीची ‘खिरापत’

Workers are upset! | कार्यकर्ते अडगळीत!

कार्यकर्ते अडगळीत!

Next

गिरीश जोशी मनमाड
थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या बहुतांश उमेदवाऱ्या नेतेमंडळींच्या नातेवाईक व आप्तेष्टांना बहाल करण्यात आल्याने राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नेतेमंडळींच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते ‘अवसानयानात’ निघाले असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. त्याचीच परिणती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहीले जाते. या निवडणुकी साठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपआपल्या नेत्यांकडे उमेदवारी साठी प्रयत्न केले होते. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोणाला तिकीट द्यायचे व कोणाला डावलायचे अशी पंचाईत नेते मंडळींची झाली. प्रमुख पक्षांमधे सुध्दा नेतेमंडळींचे विचारसरणी नुसार गट तट उपगट असल्याचे नविन नाही. त्यामुळे या गटाने सुचवलेले नाव त्या गटाला मान्य होइलच असे नाही. तर दुसऱ्या गटाने सुचवलेले नाव पहिला गट स्विकारेलच असे नाही. यातूनच शह काटशहाची समीकरणे मांडली जाउ लागली. या वर पर्याय म्हणून नेते मंडळींनी आपआपसामधे जागा वाटून घेतल्या. या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर सामान्य कार्यकर्ते मात्र अवाकच झाले. जाहीर झालेल्या उमेदवारांमधे नेते मंडळींच्या नातेवाइकांची व आप्तेष्टांची चलती असल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने व प्रामाणीकपणे काम करणाऱ्या कायकर्त्यांची उपेक्षा झाली आहे.
पक्षाशी किंवा राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या तसेच कुणालाही परिचित नसलेल्या काही नवख्या उमेदवारांमुळे तर रात्रंदिवस जिवाचे रान करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. नेत्यांसाठी व पक्षासाठी सामान्य कार्यकर्ते जीवाचे रान करत असतात. रात्रंदिवस त्यांच्या साठी राबतात. पडेल ते काम करतात. मात्र बहुतांशी राबनाऱ्या कार्यकर्त्याला पदासाठी अखेरपर्यंत झुलवत ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढावी म्हणून दुसऱ्या गोटातून फोडलेल्या कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवली जाते. नेत्यांचे नातेवाईक, मुले, आप्तेष्ट तसेच चमचेगीरी करनारे उथळ कार्यकर्ते, दुसऱ्या गोटातून फुटून आलेले कार्यकर्ते यांचे पक्षासाठी कुठलेही योगदान नसले तरी त्यांना राजकीय लाभ मिळण्यासाठी उमेदवाऱ्या बहाल करण्याच्या प्रकारामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाराज झालेले इच्छूक व त्यांचे जवळचे कार्यकर्ते या पॅटर्नमधून आपली नाराजी शमउन घेत असतात. नेतेमंडळींच्या
स्व-फायद्याच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते अडगळीत पडले आहे. हे असेच सुरु राहीले तर नेत्यांच्या मागे ‘आगे बढो...च्या घोषणा देण्यासाठी कार्यकर्ते शोधन्याची वेळ येईल अशी चर्चा शहरात सुरु आहे.

Web Title: Workers are upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.