बेलोटा कंपनीतील कामगारांना मिळणार पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:00+5:302021-05-04T04:07:00+5:30
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वेळोवेळी येणारी महागाई भत्याची वाढ मिळणार आहे. सर्व कामगारांना दरमहा ७८० रुपये पेट्रोल भत्त्यात वाढ मिळणार ...
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वेळोवेळी येणारी महागाई भत्याची वाढ मिळणार आहे.
सर्व कामगारांना दरमहा ७८० रुपये पेट्रोल भत्त्यात वाढ मिळणार आहे. सर्व कामगारांना दरवर्षी दोन लाखांची मेडिक्लेम पॉलिसी लागू होणार आहे. सर्व कामगारांना दरवर्षी मिळत असलेल्या पीएलमध्ये अजून २ ने वाढ होणार आहे. सर्व कामगारांना दरवर्षी बोनस पूर्ण पगार (ग्राॅस वेतन) देण्यात येणार असून, ही पगारवाढ दि. १ जुलै २०२० पासून लागू करण्यात येणार आहे. मागच्या फरकासह अनेक लाभ या कामगारांना मिळतील.
या पगारवाढीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यावेळी डॉ. डी.एल.कराड, तसेच कंपनीचे संचालक प्रशांत जोशी व युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, चिटणीस अरविंद शहापुरे, गौतम कोंगळे, कमिटी मेंबर्स अजित लोखंडे, योगेश गायकवाड, चंदर शितोळे, भारत गोलसर, प्रवीण रानडे, सागर रजनोर, तुकाराम कडभाने आदी उपस्थित होते.