कामगाराचे शव दुपारी कामगार व नातेवाइकांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

By admin | Published: April 17, 2015 01:09 AM2015-04-17T01:09:53+5:302015-04-17T01:10:30+5:30

कामगाराचे शव दुपारी कामगार व नातेवाइकांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

Workers' body on the afternoon of afternoon by workers and relatives directly at the entrance to the municipality | कामगाराचे शव दुपारी कामगार व नातेवाइकांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

कामगाराचे शव दुपारी कामगार व नातेवाइकांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर

Next

नाशिक : हिरावाडी परिसरात सकाळी झालेल्या अपघातात घंटागाडीच्या एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत मयत झालेल्या श्रावण टोंगारे (३८) या कामगाराचे शव दुपारी कामगार व नातेवाइकांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन केले. नुकसानभरपाईच्या मागणीसाठी सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन दिले. मात्र संध्याकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन उधळून लावल्याने शरणपूरोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, रात्री आंदोलनकर्त्यांनी पुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर रास्तो रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ झाली.
जिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर श्रावणचा मृतदेह दुपारच्या सुमारास थेट महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला. जोपर्यंत मयताच्या वारसाला उदरनिर्वाहासाठी पुरेशी आर्थिक मदत ठेकेदाराकडून जाहीर केली जात नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेत महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, ठेकेदार ऋषिकेश चौधरी यांच्यासह पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी के ली. दुपारी पावणेचार वाजेपासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन अखेर पोलिसांनी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बळाचा वापर करून उधळले. यामुळे परिसरात

Web Title: Workers' body on the afternoon of afternoon by workers and relatives directly at the entrance to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.