रेल्वे मालधक्क्यावर कामगारांची निदर्शने माथाडी कामगारांचा संप : जोरदार निदर्शने; शासनाच्या विरूद्ध घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:56 AM2018-01-31T00:56:12+5:302018-01-31T00:56:51+5:30
नाशिकरोड : ३६ माथाडी मंडळाचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबतचा घेतलेला निर्णय रद्द करावा या मागणीसाठी रेल्वे माल धक्क्यावर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.
नाशिकरोड : राज्य शासनाच्या कामगार विभागाने राज्यातील ३६ माथाडी मंडळाचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबतचा घेतलेला निर्णय रद्द करावा या मागणीसाठी नाशिकरोड रेल्वे माल धक्क्यावर मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारून निदर्शने करण्यात आली. राज्य शासन कामगार विभागाने राज्यातील ३६ माथाडी मंडळाचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाºया कुठल्याही संघटनेला विश्वासात न घेता राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ व एकच माथाडी मंडळ गठीत करण्याचा निर्णय रद्द करावा यासाठी नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर महात्मा जोतिबा फुले महाराष्टÑ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व इतर माथाडी कामगार संघटनांच्या वतीने मंगळवारी रेल्वे माल धक्क्यावर काम बंद आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने करून घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये युनियनचे सरचिटणीस हिरामण तेलोरे, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, संदीप गुंजाळ, शिवाजी पालवे, स्वरूप वाघ, सुनील जाधव, दारासिंग पाटील, गोरख सुरासे आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते.