मध्य प्रदेशात अडकलेल्या मजुरांना मिळाले अन्नधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 01:47 PM2020-04-05T13:47:23+5:302020-04-05T13:47:44+5:30
मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
नांदगाव तालुक्यातील सुमारे २०० मजूर मध्यप्रदेशात अडकल. जो पर्यंत त्यांच्या कडे अन्न धान्य व पैसै होता तो पर्यंत ठिक होते. मात्र सगळ काही संपले तेव्हा टोळी मुकादम हरिभाऊ दाभाडे यांनी आपल्या नांदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे संपर्क केला. मात्र त्यांना कुठच सहारा मिळेना, या आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या वुत्ताची दखल घेऊन खासदार भारती पवार यांनी मध्य प्रदेशातील बैतुलचे खासदार उलके यांना फोनवरून सर्व आपल्याकडील अडकलेल्या मजुरांची माहिती दिली. उलके यांनी अडकलेल्या सर्व मजुरांना तेथिल जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत या मजुरांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नांदगावचे तहसीलदार योगेश जमदाडे यांनी ही मुकादम हरीभाऊ दाभाडे यांच्याकडुन व्हट्अँप द्वारे दाभाडे यांचा विनंती अर्ज व एकुण मजुरांची नावे घेतली असुन ते पुढील कार्यवाहीसाठी नाशिक जिल्हा अधिकारी यांना माहिती देणार आहेत.
------------------------
मला जेव्हा समजले की नांदगाव तालुक्यातील ऊसतोड मजूर मध्य प्रदेशात अडकले आहे . संचारबंदीमुळे इकडे तर आणता येणार नाही मात्र तेथिल खासदारांशी बोलून नागरिकांना अन्नधान्य तरी देता आले. तशी व्यवस्था तिथ केली असून त्याशिवाय त्यांच्याकडून मी दररोज माहीत घेत आह.
-भारती पवार, खासदार