मालेगाव महापालिकेत कामगार सेनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:25 AM2019-07-13T01:25:11+5:302019-07-13T01:26:04+5:30
मालेगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा आढावा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर सखाराम घोडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला
मालेगाव : महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा आढावा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर सखाराम घोडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कामगार सेनेच्या मागणीनुसार महापालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शासकीय सुट्यांच्या दिवशी सफाई व ड्रेनेज व झाडू कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला त्वरित देण्यासाठी उपविधी तयार करून येणाºया महासभेत संबंधित विषय त्वरित मंजूर करून त्यांना मोबदला देण्यात यावा, कर्मचारी व कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती त्वरित देण्यात यावी, अशी सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी बैठकीत केली. कामगारांच्या वारसांना आठ दिवसांच्या आत लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नोकरीत सामावून घेणेबाबत निर्णय झाला. दिवाळी सणाकरिता सानुग्रह तीन हजार रुपये प्रत्येक कर्मचारी कामगारांना देण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले. सफाई, ड्रेनेज व झाडू कामगारांना अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार झाडू, कपडे, साबण, हातमोजे आदी अत्यावश्यक वस्तूंचे नियमानुसार वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासनाच्या मंजुरीप्रमाणे त्वरित मंजूर करून देण्यात येईल. ज्या कामगारांची २५ वर्षं सेवा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा झालेली आहे किंवा सेवेत असताना मयत झाल्यास अशा कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना मोफत घरांचे वाटप करण्यात यावे, अशा सूचना भुसे यांनी केल्या.
मानधनावरील कर्मचारी व कामगारांना मानधनात वाढ करून देण्यात यावे, हद्दवाढ कर्मचाºयांना किमान वेतनानुसार वेतन देण्यात यावे व त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, महानगरपालिकेतील सर्व कर्मचाºयांना सध्या मिळत असलेला वैद्यकीय भत्ता ५००वरून एक हजार रुपये करण्याची मान्यता देण्यात आली.
बैठकीला उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.