पहाटेच्या गारव्याचा शेतकऱ्यांसह मजुरांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:30 AM2019-01-06T01:30:16+5:302019-01-06T01:33:17+5:30
संजय दुनबळे। नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असला तरी अद्यापही सकाळी असलेल्या गारव्याचा द्राक्षबागांमध्ये काम करणाºया मजुरांना पर्यायाने शेतकºयांनाही फटका बसत आहे. गारव्यामुळे मजुरांच्या कामाचे तास कमी झाले असून, सकाळी ७ वाजता कामाला येणारे मजूर सध्या ११ वा. येऊन दुपारी ३ वाजता सुटी करून घेत आहेत. मजुरीचे दर मात्र तेच आहेत. कामाचे तास कमी झाल्याने कामाचा उरकही कमी आहे त्यांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे.
संजय दुनबळे।
नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असला तरी अद्यापही सकाळी असलेल्या गारव्याचा द्राक्षबागांमध्ये काम करणाºया मजुरांना पर्यायाने शेतकºयांनाही फटका बसत आहे. गारव्यामुळे मजुरांच्या कामाचे तास कमी झाले असून, सकाळी ७ वाजता कामाला येणारे मजूर सध्या ११ वा. येऊन दुपारी ३ वाजता सुटी करून घेत आहेत. मजुरीचे दर मात्र तेच आहेत. कामाचे तास कमी झाल्याने कामाचा उरकही कमी आहे त्यांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे.
निफाड व दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागांमध्ये थिनिंग, डिपिंगची कामे सुरू आहेत. या कामांसाठी आदिवासी भागातील मजूर मोठ्या प्रमाणावर येत असतात. मजूर सकाळी लवकर येऊन थिनिंग, डिपिंग अशी कामे करतात. डिपिंग करताना द्राक्षाचा प्रत्येक घड औषधात बुडवावा लागतो. थंडीच्या दिवसातील या कामात औषधांमुळे मजुरांचे हात वातडून जातात. मागील आठवड्यात निफाड तालुक्यात थंडीचा कडाका अधिक असल्याने कडाक्याच्या थंडीत काम करणे जिकिरीचे झाल्याने अनेक मजुरांनी ऊन पडल्यानंतरच कामावर येणे पसंत केले आहे.
बागेत काम सुरू असतानाच दुपारी ३ वाजेनंतर पुन्हा थंडीचा जोर वाढत असल्यामुळे मजूर काम आटोपते घेत आहे. यामुळे कामाचे दिवस वाढले गेल्याने त्याचा द्राक्ष उत्पादकांना काहीअंशी फटका बसला आहे.
सध्या बहुतांश ठिकाणी ही कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच दिली जात असल्याने कामाचे तास कमी की अधिक याचा विचार केला जात नसला तरी वेळेत काम उरकले जात नसल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे. थंडीच्या दिवसात अनेकवेळा सकाळच्या वेळी द्राक्षमण्यांवर दवबिंदू पडलेले असतात.
थिनिंग, डिपिंग करताना दवबिंदू सुकणे आवश्यक असते. त्यामुळे अनेकवेळा शेतकरीही मजुरांना कामावर लवकर बोलवत नसल्याचे निफाड तालुक्यातील वनसगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी सांगितले. घडामधील द्राक्षमण्यांची संख्या होते निश्चितद्राक्षांची योग्य वाढ होण्यासाठी तीनवेळा थिनिंग केली जाते. थिनिंगमध्ये द्राक्षघडातील बारीक मणी काढून टाकले जातात. थिनिंगनंतर एका द्राक्षघडात साधारणत: ९० ते १०० मणी ठेवले जातात. काही बागायतदार ही संख्या १२०पर्यंत ठेवतात. थिनिंगनंतर द्राक्षमण्यांची योग्य फुगवण होण्यासाठी प्रत्येक घड औषधात बुडवला जातो. त्याला डिपिंग असे म्हणतात. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकºयांना ही काळजी घ्यावीच लागते. थंडीमुळे या कामांचा कालावधी वाढल्याने शेतकºयांचे आणि मजुरांचेही नुकसान होत आहे. या कामासाठी आठ ते दहा मजुरांची टोळी एकरी ४५०० रुपयांचा दर घेते. दोन-तीन दिवसात काम आटोपले तर ते त्यांना परवडते. मात्र कालावधी वाढला तर त्यांना ते परवडेनासे होते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी राहुल डुंबरे यांनी दिली.यावर्षी निफाड तालुक्यात थंडीची मोठ्या प्रमाणात लाट आली होती. यापूर्वी सन १९६२ आणि १९७० मध्ये अशा प्रकारची थंडीची लाट आली होती. त्यावेळी ऊस, द्राक्षबागा जळाल्या होत्या. इतकेच नव्हे तर बादलीतील पाण्याचा बर्फ झाला होता. त्यानंतर सन २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, अशी आठवण सारोळे खुर्द येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ जेऊघाले यांनी सांगितली.