कामगारांनी पाळला जागतिक मागणी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:46 PM2020-05-12T21:46:48+5:302020-05-12T23:26:21+5:30
सातपूर : बारा तासांचा कामाचा दिवस करणारा अध्यादेश रद्द करा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य सरकारने तीन वर्षांसाठी कामगार कायदे निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या, कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षेची व्यवस्था करा, कोरोना लढाईत कामावर असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल, सफाई कामगार व अत्यावश्यक उद्योग व सेवेतील कामगार कर्मचाऱ्यांना संरक्षक किट व ५० लाखांचा विमा द्या यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यभर ‘जागतिक मागणी दिवस’ पाळण्यात आला.

१० मे हा मागणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने सीटू युनियन, आयटक युनियनसह कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यभर ‘जागतिक मागणी दिवस’ पाळण्यात आला.
या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी व हंगामी कामगार तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीतील एमजी इंडस्ट्रीज, सागर इंजिनिअरिंग, सुप्रीम इक्वीपमेंट, अंबड औद्योगिक वसाहतीतील आॅटो काप इंडिया, नाशिक फोर्ज, रेनबो डेको प्लास, आरडी इंजिनिअरिंग, असोसिएटेड इंजिनियरिंग, काक्स रिसर्च सेंटर, सुविध इंजिनियरिंग, इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म, सिन्नरमधील सूर्या कोटिंग आदी कामगारांचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.