कंपनीतील तांबे चोरी प्रकरणी कामगारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:04 PM2018-09-07T16:04:01+5:302018-09-07T16:04:58+5:30

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तिघा कामगारांनी सतरा किलो ताब्यांच्या टिकल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे़

Workers' Offenses for Copper theft case | कंपनीतील तांबे चोरी प्रकरणी कामगारांवर गुन्हे

कंपनीतील तांबे चोरी प्रकरणी कामगारांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तिघा कामगारांनी सतरा किलो ताब्यांच्या टिकल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे़

सचिन इंडस्ट्रिजमधील ज्ञानेश्वर उगले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीतील संशयित कामगार गंगाधर घोटेकर (रा. चांदोरी), प्रदीप सोनुने (रा. खंडावा) व योगेश भवर (रा. सायखेडा़, सध्या रा़ शिवाजीनगर) यांनी बुधवारी (दि़ ५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५ हजार ९५० रुपये किमतीच्या १७ किलो वजनाच्या तांब्याच्या टिकल्या चोरून नेल्या़ या प्रकरणी तीन कामगारांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांनाही अटक केली आहे़

लेखानगरजवळ झाडांची कत्तल
नाशिक : लेखानगरमधील मिलिटरी कर्मचारी वसाहतीत अज्ञात संशयितांनी बेकायदेशीरपणे नऊ वृक्षांची कत्तल तर तेरा वृक्षांचा विस्तार कमी केल्याची घटना घडली आहे. विस्तार कमी केलेल्या वृक्षांमध्ये तीन आंबा, दोन उंबर, एक बोर, दोन सुबाभूळ, एक अशोका, एक रामफळ व दोन पिंपळ यांचा समावेश असून दोन उंबर, पाच सुबाभूळ, एक विलायती चिंच, एक निलगिरी अशी एकूण नऊ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे़ या प्रकरणी प्रकाश चौकुटे (रा़ पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत सातपूरच्या प्रबुद्धनगरमधील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़६) सकाळच्या सुमारास सातपूरच्या अंबिका स्वीट्सजवळील वेताळ बाबा मंदिराजवळ घडली़ सीताराम श्यामराव डावरे (४२) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ या अपघातात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने जखमी झालेल्या डावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़

गंधर्वनगरीत चोरी
नाशिक : उपनगर गंधर्वनगरी परिसरातील ममता रेसिडेन्सीतील रहिवासी जयप्रकाश गवांदे (मूळ रा़ गणेश प्रसाद सोसायटी,दहीसर, मुंबई) हे पत्नीसह मुंबईला गेले होते़ चोरट्यांनी गवांदे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील पैठणी साड्या, ब्लँकेट, चष्मा अशा हजारो रुपयांच्या विविध वस्तू चोरून नेल्या़ य प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बॅट-यांची चोरी
नाशिक : लवाटेनगरमधील रहिवासी गोरख मोरे यांच्या टिप्पर गाडीमध्ये बसविलेल्या २० हजार रुपये किमतीच्या दोन अ‍ॅमरॉन कंपनीच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीची चोरी
नाशिक : पाथर्डी फाट्यावरील वासननगरमधील रहिवासी महेंद्र कोरी यांची दहा हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५, बीएफ ९५३४) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Workers' Offenses for Copper theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.