पेठ तालुक्यातील मजुरांनाही लागली घराची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:57 PM2020-04-18T20:57:04+5:302020-04-19T00:42:11+5:30
पेठ : लॉकडाउनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्ह्यात रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजुरांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, जव्हार, मोखाडा, पालघर या भागातील भूमिहीन शेतमजूर दरवर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर राज्यभर स्थलांतर करीत असतात. यावर्षी अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे हजारो मजूर अडकून पडले असून, त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हाताला काम नाही व खिशात दमडी शिल्लक न राहिल्याने अनेक मजुरांनी मुलांबाळांसह जीव धोक्यात घालून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून गाव गाठले तर लॉकडाउनमुळे संचारबंदी कडक केल्याने अजूनही हजारो शेतमजूर शेतात, गावाच्या आजूबाजूला, उघड्यावर अडकून पडले आहेत.