मुद्रनालायसमोर कामगारांचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:42 PM2020-09-23T23:42:19+5:302020-09-24T01:35:24+5:30
नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे मजदुर संघ, वर्क्स कमेटी, वेल्फेअर फंड कमेटी व एम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीतर्फे बुधवारी दुपारी मजदुर संघाच्या कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली.

केंद्र सरकारची धोरणे ही सातत्याने कामगार विरोधी आहेत. कामगार कायद्यांव्दारे सरकार कामगारांची मुस्कटदाबी करत आहे.
कोरोनाचे निमित्त करुन सरकार कामगार वर्गाविरुध्द आणि सामान्य जनतेविरुध्द पावले उचलत आहे. त्यामुळे देशातील विविध कामागार संघटनांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी मजदूर संघ कार्यालय आहेत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. निदर्शने आंदोलनामध्ये राजेश टाकेकर, दिनकर खर्जुल, नंदु पाळदे, उत्तम रकिबे, कार्तिक डांगे, अविनाश देवरुखकर, संदिप व्यवहारे, इरफान शेख, अनिल थोरात, शिवाजी
कदम, दयाराम कोठुळे, चंद्रकांत हिंगमिरे, भिमा नवाळे, साहेबराव गाडेकर, नंदु कदम, रौफ शेख, आण्णा सोनवणे, विनोद लोखंडे आदी सहभागी झाले होते.