‘जिंदाल’च्या प्रवेशद्वारासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:17 PM2020-06-11T22:17:18+5:302020-06-12T00:27:26+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांनी त्यांच्या लॉकडाऊन काळात कंपनी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या तीन महिन्यांच्या काळातील पगार तसेच विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांनी त्यांच्या लॉकडाऊन काळात कंपनी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या तीन महिन्यांच्या काळातील पगार तसेच विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने सुरुवातीस तीन महिन्यांचे वेतन द्यायचे आदेश दिले होते. परंतु काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांच्या बाजूने निर्णय देत वेतन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यामुळे कामगारांमध्ये व कंपनी मालक यांच्यामध्ये पगार न दिल्यामुळे वाद निर्माण होत आहेत.
-------------------
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता कामगारांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. हे आंदोलन करण्यासाठी पोलीस प्रशासनाची निवेदनाद्वारे परवानगी घेतली होती का? जर यामध्ये एखादा कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तर... असे अनेक प्रश्न या आंदोलनानंतर उपस्थित झाले आहेत.
४कामगार कंपनी व्यवस्थापनाकडे पगाराची मागणी करत आहेत. मात्र कंपनीतील काही अधिकारी या कामगारांना कामावरून काढून टाकत असून, वेगवेगळी कारणे सांगून अडचण निर्माण करीत त्रास देत असल्याचेही आंदोलन कामगारांनी सांगितले.
--------------------
कामगारांना कंपनीतील काही अधिकारी कामावरून काढून टाकत असल्यामुळे त्यांचा रोष वाढला आहे. तसेच यामध्ये प्रशिक्षण कालावधीत काही कामगारांना कामावर घेतले होते.
प्रशिक्षण कालावधी संपला असून, या कामगारांना नियुक्तिपत्र तसेच इतर मागण्या अजूनही कंपनी प्रशासनाने पूर्ण केल्या नसल्यामुळे आंदोलन करीत असल्याचे कामगारांनी सांगितले.