कार्यकर्त्यांनो, शंभर रुपयांत करा भरपेट शाकाहारी भोजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:49 AM2019-04-05T07:49:32+5:302019-04-05T07:49:59+5:30
कार्यकर्त्यांना शंभर रुपयांत शाकाहारी, तर दीडशे रुपयांत मांसाहारी जेवणाचा दर निश्चित केला आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. तसेच प्रचारातील वस्तू व कार्यकर्त्यांवर होणारा खर्चाचे दरही ठरवून दिले असून, नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचारासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना शंभर रुपयांत शाकाहारी, तर दीडशे रुपयांत मांसाहारी जेवणाचा दर निश्चित केला आहे.
निवडणूक प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे दर ठरविण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कोषागार कार्यालयाचे अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यासाठी घेण्यात आली. त्यात हे दर निश्चित करण्यात आले.
आयोगाचे दरपत्रक
चहा, पारले बिस्कीट : १० रु
पाण्याची बाटली, भजी, पोहे,
कचोरी, फरसाण, आइस्क्रीम : २० रु
मिसळ पाव, पावभाजी : ५० रु
वडापाव, समोसा : १२ रु
वातानुकूलित हॉटेल : २०००रु/दिवस
शाल : १०५ ते २५० रु.
फुलांचे गुच्छ : २५ ते ६०० रु.
पुष्पहार : १३० ते ४५० रु.
फेटा : १९० ते ३०० रु.
टोप्या : १२ ते २० रु.