नोकरदार वर्गाचा रविवार रांगेत

By admin | Published: November 14, 2016 01:40 AM2016-11-14T01:40:41+5:302016-11-14T01:43:24+5:30

रांगच रांग : सर्वसामान्यांचे वाढले हाल, अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग; शंभराच्या नोटांचा तुटवडा

The working class Sunday queues | नोकरदार वर्गाचा रविवार रांगेत

नोकरदार वर्गाचा रविवार रांगेत

Next

नाशिक : शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने फिरण्यासाठी बाहेर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला रविवार मात्र बॅँकेच्या रांगेत उभे राहून काढावा लागला. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांची सुटी असल्याने बॅँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोमवारीदेखील सुटी असल्यामुळे कर्मचाऱ्यांची ही सुटीदेखील बॅँका, एटीएमच्या रांगेत घालवावी लागणार आहे.
बॅँका सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र बॅँकांचे दरवाजे दुपारनंतर बंद करीत असल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. कॅश संपल्याचे कारण पुढे करीत तर कधी बॅँका जादा वेळ सुरू करण्याची सूचना मिळाली नसल्याचे कारण देत रांगेतील ग्राहकांना माघारी धाडले जात आहे.
एटीएमएम मशीनमध्येही पुरेसे पैसे नसल्यामुळे अनेक एटीएम मशीन कालपासून बंद आहेत. तर ज्या ठिकाणी कॅश उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मात्र प्रचंड गर्दी झाल्याने या मशीन्सवरील ताणही वाढला आहे.
(प्रतिनधी)

Web Title: The working class Sunday queues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.