चेंबरच्या वतीने कार्र्र्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:07 PM2019-03-16T23:07:37+5:302019-03-17T00:28:29+5:30

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर आणि प्लॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकप्रक्रिया उद्योगासाठी सामूहिक सुविधा केंद्र योजना संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते.

Workshop on behalf of the Chamber | चेंबरच्या वतीने कार्र्र्यशाळा

चेंबरच्या वतीने कार्र्र्यशाळा

Next

नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर आणि प्लॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकप्रक्रिया उद्योगासाठी सामूहिक सुविधा केंद्र योजना संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, कार्यकारिणी सदस्य रविश मारू, उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख, उद्योग उपसंचालक उमेश दंडगव्हाळ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संतोष मंडलेचा म्हणाले, एकाच प्रकारच्या उद्योगांना कॉमन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर योजना अतिशय चांगली आहे. त्याचा उपयोग आपण करून घ्यावा. केंद्र व राज्य शासन व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विविध योजना जाहीर करते, योजना चांगल्या असतात. परंतु त्या लाभार्थीपर्यंत पोहचत नाही. महाराष्ट्र चेंबर अशा योजना कार्यशाळा व चर्चासत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविते, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी स्वागत केले. रविश मारू यांनी प्रास्ताविकातून कार्यक्र माची माहिती दिली. उद्योग सहसंचालक देशमुख यांनी कॉमन फॅसिलिटी सेंटरची माहिती दिली. या योजनेसाठी सरकार ८० टक्के रक्कम देते व २० टक्के रक्कम उद्योजकांना उभी करायची आहे. त्यामुळे त्याचे क्लस्टर येथे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Workshop on behalf of the Chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.