रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये  ‘सतारवादन’ विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:13 AM2018-04-29T00:13:21+5:302018-04-29T00:13:21+5:30

येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय संगीत आणि वादन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सतारवादन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 Workshop on "Etartadan" topic at Rasbihari International School | रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये  ‘सतारवादन’ विषयावर कार्यशाळा

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये  ‘सतारवादन’ विषयावर कार्यशाळा

googlenewsNext

नाशिक : येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय संगीत आणि वादन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सतारवादन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी कॅनडास्थित क्रिस्तोफ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच सतारवादनाचे सादरीकरण केले. शाळेतील सकाळच्या प्रार्थना सत्रात त्यांनी राग भैरव आणि किरवाणी ही धून विद्यार्थ्यांसमोर सादर केली. तसेच गिटारवादन करून विद्यार्थ्यांना प्रभावित केले. सुभाष दसककर यांनी तबलावादन करून साथसंगत दिली.  भारतीय सुरांची जादू ही देश-विदेशात पसरली असून, ते योग-संगीत म्हणून कसे प्रभावी आहे, याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी वाद्य वादनाचे शिक्षण किंवा गायनाची आवड जोपासली पाहिजे, याबद्दल विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title:  Workshop on "Etartadan" topic at Rasbihari International School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा