शाडूमातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:16 AM2021-08-26T04:16:45+5:302021-08-26T04:16:45+5:30
नांदगाव : येथील व्ही. जे. हायस्कूलमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने झाली. ...
नांदगाव : येथील व्ही. जे. हायस्कूलमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने झाली. मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी, गेली १३ वर्षे विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
कोविड-१९ च्या महामारीत खंड पडू नये व विद्यार्थांना घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा हा हेतू कार्यशाळा आयोजनामागे आहे. निवडक विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस ऑफलाईन पद्धतीने शाळेत गणपती कार्यशाळा घेण्यात आली. सध्या मोबाईलवर सुरू असणाऱ्या अभ्यासातून बाहेर पडून मूर्ती तयार केल्यामुळे विद्यार्थी आनंदी झाले. ऑनलाईनसाठी व्हिडीओ तयार करण्यात आला. कलाशिक्षक विजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे, सुरेश गावित यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित गणेश मूर्तीच घरी स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप यांनी मार्गदर्शन केले. तयार केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जनही घरीच करावे व हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव घरच्या घरीच साजरा करावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल, सचिव आश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप, प्रकाश गरुड, भैय्यासाहेब चव्हाण, भास्कर मधे यांनी विद्यार्थांना व पालकांना केले आहे.
-----------------
नांदगावच्या व्ही. जे. स्कूलमध्ये गणेशमूर्ती तयार करतांना विद्यार्थी.
(२५ नांदगाव व्हीजे)
250821\25nsk_5_25082021_13.jpg
२५ नांदगाव व्ही.जे.