मालेगाव जिल्हा न्यायालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:23 AM2019-11-20T01:23:30+5:302019-11-20T01:23:53+5:30
विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मालेगाव : विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्यशाळेत मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, तहसीलदार राजपूत उपस्थित होते.
यावेळी मालेगाव जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी मृत्युपूर्व जबाब कसा घ्यायचा, चार्जशिट दाखल करताना काय काळजी घ्यायची तसेच अॅक्सिडेंट क्लेममध्ये तपास अधिकारी यांनी विशेष काळजी कोणती घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. मालेगाव वकील संघाचे सदस्य पी. बी. मर्चंट तसेच अॅड. संजय शेवाळे, न्यायाधीश वाय. पी. पुजारी, ए. के. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचेही भाषण झाले.
प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. के.
बच्छाव यांनी केले. यावेळी न्यायाधीश श्रीमती जे. डी. हुशंगाबादे, डी. डी. कुरूलकर, ए. एस. गांधी, श्रीमती एम. डी. कांबळे, एन.
एन. धेंड, जे. जे. इनामदार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव अॅड. किशोर त्रिभुवन यांनी केले. आभार उपाध्यक्ष अॅड. मलीक शेख यांनी मानले.