मालेगावी बेघर निवाऱ्याबाबत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 06:42 PM2020-02-20T18:42:23+5:302020-02-20T18:43:45+5:30
मालेगाव महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा या विषयावर येथे पोलीस विभाग व महापालिका यांच्यात परिसंवाद कार्यशाळा झाली.
मालेगाव : महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा या विषयावर येथे पोलीस विभाग व महापालिका यांच्यात परिसंवाद कार्यशाळा झाली.
प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अॅड. ज्योती भोसले, उपायुक्त (कर) रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस होते. कार्यशाळेस सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक नाजीम शेख, व्ही.डी. गोपाल, व्ही. ओ. वसावे, एस. एस. वाघ, अजहर शेख उपस्थित होते.
बेघर लाभार्थी यांचा विश्वास नसणे, समाजात त्यांना दिली जाणारी वागणूक, त्यांनाही समाजात स्थान मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्योती भोसले यांनी मार्गदर्शन केले.
उपायुक्त (प्रशासन) कापडणीस यांनी केंद्र शासन मार्गदर्शक सूचना केल्या. उपायुक्त (कर) रोहिदास दोरकुळकर यांनी पोलीस विभागाकडून अपेक्षा निवाराच्या अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर यांनी केले, तर आभार संदीप वाघ यांनी केले. निवारा व्यवस्थापक मनोज कुकलेरे, समुदाय संघटक संदीप वाघ, मधुर संसारे, ओबेद शेख, नितीन महाजन, चेतन खांडेकर, मनीष सूर्यवंशी, कल्पना सोनपसारे, हिरकणी वाबळे, बेबीनंदा मुळे, इशारत झा, शाहीन शेख, वहिदा जब्बार, मीना बोरसे, सुफिया शेख उपस्थित होते.