जिल्ह्यातील अधिकाºयांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:47 AM2018-02-27T01:47:17+5:302018-02-27T01:47:17+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºयांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºयांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र विकास सेवेच्या नाशिक शाखेच्या वतीने विभागीय आयुक्त महेश झगडे तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाºयांना संरक्षण देण्यासाठी एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास सेवेच्या नाशिक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाºयांना शासकीय काम करताना शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे, मारहाण करणे असे प्रकार वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्णातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भर रस्त्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून, सदर कृत्य हे मानसिक मनोबल खच्चीकरण करणारे आहे. अशा घटना महाराष्ट्रात उदगीर, हिंगोली, मंठा, परभणी, चाळीसगाव, औरंगाबाद, यवतमाळ, कळंब, रिसोड, धुळे येथेदेखील घडल्या आहेत. राज्यतील ३४ जिल्हा परिषद मुख्यालय, ३५६ पंचायत समित्यास्तरावर कार्यरत असलेले गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, यांना संरक्षण म्हणून एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चौधरी, प्रमोद पवार, राजेंद्र पाटील, मधुकर मुरकुटे, प्रतिभा संगमनेरे, किरण जाधव, डोंगर बहिरम, सुनील अहिरे, पांडुरंग कोल्हे, आनंद पिंगळे, भुपेंद्र बेडसे, हिरामन मानकर, केशव गड्डापोड, जितेंद्र देवरे, महेश पाटील, जगन्नाथ सूर्यवंशी, भालचंद्र बहिरम, रत्नाकर पगार, संदीप कराड, महेंद्र कोर, भारत वेंदे, संदीप वाठरकर, शरद कासार, नीलेश पाटील, राजेंद्र देसले, अन्सार शेख, किसान खताळे, शिवा जाधव, अनिल भुसावरे, धीरज पाटील, दिलीप सोनकुळे आदी उपस्थित होते.