निमगाव महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:57+5:302021-02-07T04:13:57+5:30
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना, महाराष्ट्रातील व देशातील रस्ते ...
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना, महाराष्ट्रातील व देशातील रस्ते अपघाताचे भयावह स्थिती स्पष्ट केली, तसेच रस्ते अपघातातील जबाबदार घटकांची मीमांसा केली. अपघात झाल्यानंतर करावयाच्या मदतीची पद्धत सांगताना, नवीन कायद्यांचाही त्यांनी उल्लेख यावेळी केला. अशोक निकम यांनी सामान्य शिक्षणाबरोबरच लोकांनी वाहन शिक्षणावरही भर दिला पाहिजे, महाविद्यालयांनी त्यासाठी जनजागृती केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी तरुण पिढी व वाहने यांची सद्य परिस्थिती सांगताना विविध उदाहरणे दिली. त्याचबरोबर, पालकांची जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला, तसेच तरुणांनीही वाहन चालवताना जबाबदारीने चालविली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.बी.यू.पवार व आभार प्रदर्शन प्रा.एस.एल. अहिरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे विश्वनाथ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अशोक विश्वनाथ निकम व निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निकम आदीसह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.